धाराशिव (प्रतिनिधी)-उपसा पद्धतीने पाणी घेणार्‍या शेतकर्‍यांसाठी यापूर्वी 120 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे वसुली केली जात होती. कॅनॉल व इतर ठिकाणाहुन पाणी घेणार्‍यांना हेक्टरी 1200 रुपये व त्यावर 20 टक्के स्थानिक सेसने पाणीपट्टी वसूल करण्यात येणार असल्याचा फतवाच सुलतानी सरकारने काढला असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.

शेतकरी सध्या अडचणीत असताना त्यांच्या पाण्यावरील कर दहा पट्टीने वाढवुन सुलतानी सरकारने शेतकर्‍यावर जुलुम चालविल्याची भावना आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे. जाहीरातबाज सरकार शेतकर्‍यांच्या बाबतीत दररोजच वेगवेगळ्या पध्दतीने अन्याय करताना दिसत आहे. केंद्र सरकारने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करु अशा घोषणा काही वर्षापासुन सातत्याने केल्या. नवीन सरकार आल्यापासुन शेतकर्‍यांचे सरकार असल्याचा जप करत आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न तर वाढलेच नाही पण उत्पादन खर्च वाढविण्यात सरकारने कोणतीही कसुर ठेवली नाही. सोयाबीनसह अन्य पिकाच्या दरामध्ये कायम काढणीवेळी घसरण करण्याचा सरकारने जाणीवपुर्वक प्रयत्न केल्याचे दिसुन आले आहे.


मीटरची सक्ती

पाण्याच्या मोटारीला वॉटर मीटर बसविण्यास जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शेतकर्‍यांना सक्ती केली आहे. त्या मीटरची किंमत पाच हजार रुपये असुन मीटर  यातुन नेमक कोणाचे हित साधायचे आहे असा प्रश्न निर्माण होत असल्याची शंका आमदार कैलास पाटील यानी व्यक्त केली आहे.


 
Top