धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 36 वा स्मृतिदिन रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. 

डॉ. बापूजींच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकताना प्रा. डॉ .शिवाजी गायकवाड म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे एक व्यक्ती नसून तो एक विचार होता. त्यांनी लिहिलेल्या संस्थेच्या प्रार्थनेतून राम, कृष्ण, रहीम, ख्रिस्त, बुद्ध, महावीर यांची मानवतावादी विचारसरणी समाजात रुजली पाहिजे. त्या प्रार्थनेच्या सारांशातूनच सर्व धर्म, जाती, पंथांना सोबत घेऊन जाण्याची ,त्या महामानवांना वंदन करण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. डॉ. बापूजी साळुंखे यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतून चारित्र्यवान असा माणूस घडवायचा होता. ते घडवताना त्यांनी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या ब्रीद वाक्याचे धडे दिले. सत्य,शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणूकीस आळा या पंचतत्वाद्वारे उद्याचा सहिष्णुतावादी नागरिक त्यांना हवा होता. म्हणूनच त्यांनी विश्वबंधुत्वाची प्रार्थना या संस्थेला दिली. म्हणूनच डॉ.बापूजी साळुंखे हे सर्वधर्म समभावाचे प्रतिक ठरले.

दर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीराम नागरगोजे हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले,तर आभार डॉ. डी वाय साखरे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.  सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top