परंडा (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांनी स्वतःला झोकून देऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावे स्वतःचे आणि आपल्या आई वडिलांचे नाव समाजामध्ये उज्वल करावे असे प्रतिपादन परंडा येथील तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे आयोजित केलेल्या महसूल सप्ताह निमित्त युवा संवाद कार्यक्रमात व्यक्त केले .

महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 /प्र क्रं 149 /ई -1 / दि. 25 जुलै 2023 मा जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक 2023 महसूल /जमा -2 / कावि दि.25 जुलै 2023 या आगस्ट  च्या संदर्भीय पत्रानुसार महसूल विभागाकडून देण्यात येणार्‍या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणार्‍या विविध योजना याबाबत नागरिकांमध्ये अधिकाधिक माहिती पोहोचावी याकरिता महसूल सप्ताह व युवा संवाद कार्यक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने यांच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार घनश्याम अडसूळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार उत्कर्षा जाधव सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे मंडल अधिकारी पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले. यावेळी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार घनश्याम अडसूळ म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून गुणवत्तापूर्वक शिक्षण घ्यावे. स्पर्धा परीक्षा साठी तयारी करावी.मोठमोठे अधिकारी व्हावेत.नायब तहसीलदार उत्कर्षा जाधव यांनीही लोकसभा विधानसभा निवडणूक संदर्भात मतदार म्हणून मतदारांची जबाबदारी काय असते यासंदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा. किरण देशमुख यांनी मानले.


 
Top