धाराशिव (प्रतिनिधी)- गतवर्षी 2022 मध्ये संततधार पावसाने धाराशिव जिल्हयातील शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते  राज्य शासनाने बाधित शेतकर्‍यांना अनुदान देणे सुरू केले आहे परंतु अदयाप जिल्हयातील अनेक शेतकरी या अनुदानापासुन वंचीत आहेत त्यामुळेे नुकसान झालेल्या सर्वच शेतकर्‍यांना राज्य शासनाने अनुदान दयावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकर्‍यांना निवेदन देऊन केली आहे

  निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या  जिल्हयातील बाधित शेतकरयांना अनुदान वाटप सुरू केले आहे परंतु बहुतांश शेतकर्‍यांचे अनुदानाच्या यादीत नावच न आल्यामुळे शेतकर्‍यांत संताप व्यक्त होत आहे धाराशिव जिल्हयातील सर्वच तालुक्यात ही परिस्थिीती दिसुन येत आहे नुकसानग्रस्त सर्वच शेतकर्‍यांना अनुदान मिळणे अपेक्षितआहे जिल्हयातील एकही शेतकरी या अनुदानापासुन वंचित राहु नये ही किसान मोर्चाची भुमिका आहे त्यामुळे राज्य शासनाने या बाबीचा विचार करून सर्वच शेतकर्‍यांना अनुदान देण्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख तथा माजी  जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश देशमुख, नानासाहेब यादव, तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


 
Top