नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग परिसरातील शेतकऱ्यांची सोयाबीन पिकासह इतर पिकांची पावसाने उघडीप दिली आसल्याने हाल होत असून मोठया प्रमाणात शेतकऱ्यांची खरीप पिके वाळून जात आहे. हाता तोंडाशी आलेला घास आता पाउस नसल्याने हिरावून घेतला जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन दिवसात पाउस झाला तर थोडया फार प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
शहर व परिसरात सध्या मोठया प्रमाणात पावसाने उघडीप दिली आहे, मोठया प्रमाणात पावसाने उघडीप दिली आसल्याने खरीपांची पिके पूर्ण पणे वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शेतकरी तुषार सिंचनचा केवीलवाणा वापर करीत आहेत. मात्र याचा फारसा उपयोग होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. कारण सोयाबीन, मुग उडीद आणि तुर पिकासाठी पावसाचे पाणीच चांगले असते, पाउस पडला तरच पिकांची चांगली वाढ होत असते मात्र पिके फुल लागणीच्या उंबरठयावर आसताना आचानाक गेली वीस ते पंचेवीस दिवस झाले पावसाने मोठी उघडीप दिली आहे, त्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात हवालदील झाला आहे. अशा परिस्थीतीत आता शेतकरी काय करावा या चिंतेत सापडला आहे. पाउसच नसल्याने हाता तोंडाशी आलेले घास हिरावून घेतला जात आसल्याने शेतकरी पुरता नाराज झाला आहे. परिसरातील नळदुर्गसह चिकुंद्रा, मुर्टा, मैलारपूर तांडा, होर्टी, किलज, सलगरा दि., जळकोट, नंदगाव, लोहगाव, सिंदगाव, बोरगाव तु. कुन्सावळी, बोळेगाव, येडोळा, शहापूर, गुजनुर, दहीटणा, निलेंगाव, केशेगाव, इटकळ, सराटी, धनगरवाडी, खुदावाडी आदी भागातील खरीप पिके पूर्ण वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत, येत्या दोन दिवसात पाउस आला तर शेतकऱ्यांच्या खरीप पिकास दिलासा मिळणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांवर फार मोठे संकट कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण सध्या फुले लागून सोयाबीन व उडीद पिकाला शेंगा लागणीची वेळ आहे, परंतु पाउस नसल्याने उन्हाच्या चटक्याने शेंगामध्ये बियानाचा भरणा होत नाही. परिणामी शेंगा वांझोटी होत असल्याने सोयाबीन च्या उत्पन्नापासून शेतकरी वंचीत होत आहेत. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात पाउस येणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा शेतकऱ्यांना सोयाबीन, मुग, उडीद या पिकाच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. दरम्यान शासनाच्या महसूल विभागाने तात्काळ तलाठयामार्फत चौकशी करुन पंचनामा करावा अशी मागणी ही शेतकरी वर्गातून होत आहे.