तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात कमला एकादशी निमित्ताने भाविकानी दर्शनासाठी गर्दी केली होती.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात कमला एकादशी निमित्ताने भाविकानी दर्शनासाठी पहाटे पासूनच गर्दी केली होती. मिळेल त्या वाहनाने भाविकभक्त मंदिरात दर्शनासाठी येत होते.  

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखा तेरच्या वतीने भाविक भक्तांना शाबुदाना उसळ वाटत करण्यात आली. यावेळी विठ्ठल कदम ,सुरज तापडे ,सौरभ जाधव, शिवाजी पडूळकर,दशरथ कोळेकर, रमेश लकडे, प्रविण बंडे ,सुरज कोळपे, बापू देवकते, महादेव थोरात, धनंजय सूर्यवंशी ,सोमनाथ टेळे ,शाहीर आंधळे ,सुरज हाके ,राजभाऊ कोकरे, संकेत झीजे, सुरज थोरात, वैभव ढेकणे, दत्ता सलगर, अमोल खांडेकर आदी उपस्थित होते.


 
Top