धाराशिव -  येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तेरणा ट्रस्टचे विश्वस्त मा. अशोकभाऊ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती.  सर्वप्रथम प्रतिमापूजन आणि ध्वजारोहण केल्यानंतर विश्वस्त अशोकभाऊ शिंदे यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासमोर ठेवला. त्यांनी अनेक उदाहरणे देऊन भारत अमृत महोत्सवी वर्षात कशा पद्धतीने प्रगतीपथावर आलेला आहे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच भावी पिढीने या मधूनच प्रेरणा घ्यावी असेही आवाहान केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .यानंतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी यांची प्रभात फेरी काढण्यात आली. एन एस एस ऑफिसर प्रा. प्रमोद तांबारे यांनी कार्यक्रमाचे  नियोजन केले.

 
Top