तेर (प्रतिनिधी)- तिरूपती येथील बालाजी मंदिर येथे पुरूषोत्तम (अधिक)मासानिमीत्त आयोजित कार्यक्रमात धाराशिव तालुक्यातील तेर येथील वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेतील 100 विद्यार्थी यांनी नगर प्रदक्षिणाच्यावेळी पाऊल, अभंग,फुगडी, गवळण उत्कृष्ट प्रकारें सादर केल्याने उपस्थित भाविक भक्त बाल वारक-यांचा कलाविष्काराने भाराऊन गेले.
आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील बालाजी मंदिर देवस्थानच्या वतीने पुरुषोत्तम (अधिक) निमित्ताने आयोजित कार्यक्रमात 3 ऑगष्टला धाराशिव तालुक्यातील तेर येथील वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.रघुनंदन महाराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी होऊन नगर प्रदक्षिणाच्यावेळी पाऊल, अभंग, फुगडी, गवळण आदी कलाविष्कार सादर केले.बाल वारक-यांचा विविध कलाविष्काराने उपस्थित भाविक भक्त मंत्रमुग्ध होऊन भाराऊन गेले.