धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे खाटांच्या ग्रामीण रुगणालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी शासनाने मान्यता दिली. त्यासाठी शिवसेना (बाळासाहेब) चे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी पहिल्यापासून पाठपुरावा केला होता. त्यामुळेच मान्यता मिळाली असल्याची माहिती साळुंके यांनी दिली आहे.
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची श्रेणीवर्धन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासाठी साळुंके यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे या आरोग्य केंद्राच्या खाटांच्या ग्रामीण रुगणालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास खास बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तर हे ग्रामीण रुग्णालयास जागा उपलब्ध असल्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यावर शासन स्तरावर पदनिर्मिती करण्यासाठी स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल. तसेच हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 202308031152171717 असा आहे. हा आदेश राज्यपालांच्या डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला असल्याचे साळुंके यांनी सांगितले आहे.