नळदुर्ग (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यांतील नागरीकांना व्यसनापासुन मुक्त करावे यासाठी महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक मारुती बनसोडे यांनी धाराशिव जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन आज राखी बांधली आहे.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या कडुन आज राखी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात हा अभिनव उपक्रम राबवुन व्यसनमुक्तीसाठी प्रचार प्रसार व प्रबोधन करण्यात येत आहे. राखी बांधण्याचा संदर्भ आता आपण बदलला पाहिजे पुर्वी बहीण भावाला संकट काळी माझे संरक्षण करावे म्हणुन राखी बांधली जात होती. आता बऱ्या पैकी महिला सक्षमीकरण झाले आहे. आता ज्या समस्या आहेत त्या समस्या निर्मुलन करण्यासाठी राखी बांधणे आवश्यक आहे.म्हणुन सध्या व्यसनांचे प्रमाण अधिक वाढले आहे. तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्धस्त करुन घेत आहेत. या युवा पिढीला व्यसनापासुन परावृत्त करणे गरजेचे आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणुन जिल्ह्याला व्यसनापासुन परावृत्त करण्यासाठी त्यांना राखी बांधण्यात आली आहे असे मारुती बनसोडे यांनी सांगितले आहे. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी भुजबळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
