धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मंगळवारी शहरातील एमआयडीसी येथे (दि.29) वृक्षारोपण करून झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. धार्मिक सणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. तसेच प्रत्येक महिला पदाधिकाऱ्याने घरासमोर एक झाड लावून वर्षभर संगोपन केल्यास पुढील वर्षीच्या रक्षाबंधनला एक सोन्याची राखी भेट देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ.मनीषा शिवाजी पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाडांना राखी बांधण्यात आली. तसेच पोलीस बांधवांनाही राख्या बांधण्यात आल्या. यावेळी आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर, राष्ट्रवादीचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील, माजी उपनगराध्यक्ष अमित शिंदे, आर्किटेक्ट दशरथ धुमाळ, रोहीत बागल, एपीआय गोरक्षनाथ खरड, हनुमंत म्हेत्रे, ॲड.भाग्यश्री रणखांब, अशोक बांगर, अशोक सोन्ने पाटील, मंजुषा खळदकर, सागर शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष रंजना भोजने, रागिनी गुळवे, राणी भोसले, नीला राठोड व इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.
घरासमोर झाड लावून फोटो व्हाटसॲपवर पाठवा
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या घरासमोर झाड लावून त्याचा फोटो 9665090909 या व्हाटसॲप क्रमांकावर पाठवावा. पुढील वर्षी राखी पौर्णिमेपर्यंत ज्या महिलांनी झाडाचे संगोपन करून वाढवले आहे, अशा महिला पदाधिकाऱ्यांना सोन्याची राखी भेट देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ.मनीषा शिवाजी पाटील यांनी यावेळी दिली.