कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील खामसवाडी गावांमध्ये मागील आठ ते दहा दिवसापासून गावामध्ये अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारामुळे गावातील अनेक नागरिक त्रस्त असल्याने येथील ग्रामपंचायत सदस्य विश्वास कोकणे यांनी कळंब तालुका आरोग्य अधिकारी यांना दि.24ऑगस्ट 2023 रोजी निवेदन देऊन तात्काळ रोगप्रतिबंधक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. 

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, खामसवाडी गावातील काही व्यक्तींना चिकन गुनियाच्या आजाराची लागण झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असल्याचे सांगितले आहे तर गावातील परिसरामध्ये डासांचे ही मोठ्या प्रमाणात संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून सदरील ठिकाणी योग्य ती औषध फवारणी करणे अत्यावश्यक आहे. परंतु आरोग्य विभागाकडुन देखील  दुर्लक्ष होत असल्याने दिसत आहे. भविष्यामध्ये सदरील  साथीचे आजार किंवा आरोग्यास धोका निर्माण होवू नये. म्हणून खामसवाडी तात्काळ उपाययोजना राबवुण साथ रोग आटोक्यात आणावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह नागरिकांमधून होत आहे.


 
Top