धाराशिव (प्रतिनिधी)-तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, धाराशिव व धेनू ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय ऑनलाईन डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. 31 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व युवक युवतीही ऑनलाईन सहभागी झाले होते.
या डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या हस्ते पार पडले तसेच डिजिटल उद्योजकता या कार्यक्रमादरम्यान, डिजिटल व्यवसाय व संधी, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल प्रमोशन, तसेच डिजिटल बिजनेस स्ट्रॅटेजी, रोजगार निर्मितीचे धेनू डिजि मार्ट मॉडेल यासारख्या विविध विषयावर अमित काळे, दिनेश खलाटे, प्रतीक काटकर, ज्ञानेश्वर काशीद, उदयसिंह दळवी, तसेच धेनू कंपनीचे कार्यकारी संचालक, संतोष खवळे व डिजिटल बिजनेस मॅनेजर श्री. नितीन पिसाळ इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमादरम्यान डिजिटल उद्योजकता या विषयावर आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय स्तरावर नेमणूक झालेले प्रथम स्तरावरील सहभागी राम खिल्लारे, समाधान रसाळ, नागेश पाठक द्वितीय स्तरावरील सहभागी- ज्ञानेश्वर शेरकर, अभिषेक जाधव, उस्मान शेख व तृतीय स्तरावरील सहभागी- रझवी अहमद व नयन कापसे या आठही स्पर्धकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व सहा हजार रुपये किंमतीचा डिजि मार्ट रिटेलर प्लॅनचे पारितोषिक वितरण तेरणा कॉलेजचे प्राचार्य व सहयोगी प्राध्यापक तसेच धेनू कंपनीचे डिजिटल बिझनेस मॅनेजर, नितीन पिसाळ व डिजिटल मीडिया मॅनेजर, सूरज खवळे यांच्या हस्ते दि. 22 ऑगस्ट 2023 रोजी पालक मेळाव्या दरम्यान वितरण करण्यात आले.
तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पदमसिंह पाटील, ट्रस्टी आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील, आणि तेरणा ट्रस्टचे समन्व्यक प्रा. गणेश भातलवंडे, ट्रैनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अशोक जगताप व सर्व कर्मचाऱ्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.अशोक जगताप, प्रशिक्षण अधिकारी (टी.पी.ओ) यांनी केले . तसेच हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धेनूची सर्व टीम तसेच तेरणा कॉलेज मधील विविध विभागांचे प्राध्यापकांचे विशेष सहकार्य लाभले.