धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि धेनू अॅप यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय डिजिटल उद्यमिता प्रशिक्षण या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी धेनू कंपनीचे कार्यकारी संचालक- श्री. संतोष खवळे, प्रकल्प समन्वयक- सौ. समृद्धी काळे, व डिजिटल बिझनेस मॅनेजर- श्री. नितीन पिसाळ तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने व इतर सर्व विभागप्रमुखांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती.
दि. 31 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 या कालावधी दरम्यान सुरु असणार्या डिजिटल उद्यमीता प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच इतर युवक ,युवती सहभागी झाले आहेत. हे प्रशिक्षण पूर्ण करणार्या सहभागी उमेदवारांना सहभाग प्रमाणपत्र व निवडक उमेदवारांसाठी आकर्षक बक्षीसे ही ठेवण्यात आलेली आहेत. तसेच धेनू अॅपच्या माध्यमातून जे उमेदवार या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून अग्रेसर राहतील त्यांना धेनू अॅपच्या वतीने डिजी मार्ट या नवीन संकल्पनेअंतर्गत ऑनलाईन कृषी उत्पादनाच्या विक्रीसाठी ऑनलाईन दुकान विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल.
त्यामुळे आपल्या भागातील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच रिकाम्या वेळेमध्ये त्यांचा डिजिटल बिझनेस सुरु करून किमान पाच हजार रुपये प्रति महिना सहजपणे मिळवू शकतील. त्यांच्या डिजिटल व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालक बांधवांना ते दर्जेदार उत्पादने व सेवा सुलभतेने पुरवू शकतील. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माने यांनी सद्या सोशल मीडियाचा वापर आपण सर्रास करत असून याच्याच माध्यमातून आपण सोशल मार्केटिंग का करू नये? असे प्रतिपादन केले. पुढे बोलताना ते म्हणाले कि मेझॉन, फ्लिपकार्ट तसेच डिजिटल विश्वात काम करणार्या इतर कंपन्यांनाही मार्केटमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी वापरलेल्या डिजिटल पॉवर आणि मार्केटिंग तंत्राचा वापर करून आपणही डिजिटल व्यवसाय कसा उभारू शकतो हेच याचे बाळकडू या प्रशिक्षणातून मिळणार आहे.
मार्गदर्शनपर संबोधनात संतोष खवळे म्हणाले कि, डिजिटल विश्वामध्ये अत्यल्प भांडवलात व्यवसाय करण्याची नामी संधी असून त्याचा वापर हा विद्यार्थ्यांनी तसेच ग्रामीण भागातील युवा पिडीने केला पाहिजे आपला स्मार्टफोन व डिजिटल स्किल वापरून धेनूच्या डिजि मार्ट संकल्पनेतून आपण सहजपणे व्यवसाय सुरु करू शकता या अॅप मध्ये असलेल्या लाखभर शेतकरी ग्राहकांचे मार्केट धेनू पच्या माध्यमातून या डिजिटल उद्योजकांसाठी आम्ही खुले केले आहे.
या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, तरुणांनी स्वयंप्रेरित होऊन डिजिटल जगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी डिजिटल उद्योजकतेचे हे प्रशिक्षण सक्रिय सहभागातून पूर्ण करणे गरजेचे आहे.
या प्रशिक्षणासाठी तज्ञ् मार्गदर्शक उपलब्ध झाले असून हुन अधिक उमेदवारांना कार्यक्रमादरम्यान ते यशस्वीरित्या मार्गदर्शन करत आहेत. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तेरणा कॉलेजच्या वतीने प्रशिक्षण अधिकारी (टी.पी.ओ) अशोक जगताप व धेनू टीम कार्य करत आहे