तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काटगाव येथील मंदिरातून श्री विठ्ठल बिरुदेव व मालीगरायांची मुर्ती चोरीच्या घटनेस दोन वर्ष उलटले तरी अद्यापही चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. पोलिसांनी चोरीच्या घटनेचा तपास लावावा, अशी मागणी भाविकातून होत आहे. काटगाव येथील श्री विठ्ठल बिरुदेव व मालीगराया या दोन देवतांचा सव्वातीन किलोच्या चांदीच्या मुर्ती चोरट्यांनी डिसेंबर 2021 मध्ये चोरून नेल्या आहेत. या चोरी प्रकरणाच्या तपासासाठी भाविकांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. परंतु अद्यापही पोलिसांना चोरीचा तपास लावण्यात यश आले नाही. घटनेच्या 6 महिन्यानंतर नळदुर्ग पोलीस निरीक्षकांना चोरी संदर्भात निवेदन दिले तरीही चोर सापडले नाहीत. पोलिसांकडून फक्त तपास चालु आहे ऐवढेच उत्तर मिळत आहे.तसेच जळकोट इटकळ,काटगाव,सह भागात अवैध धंदे राजरोस सुरु असुन याचाही बंदोबस्त करण्याची मागणी मागणी होत आहे तरी नुतन उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ निलेश देशमुख यांनी या चोरीचा तपास लावून देवतांचा मुर्ती तत्काळ मिळवून देण्याची
मागणी भाविकातून होत आहे.