धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील निवृत्ती भवन समता नगर येथे रानकवी स्व.ना.धों महानोर प्रसिद्ध कला दिग्दर्शक स्व. नितीन चंद्रकांत देसाई जिल्हा संस्कार भारती समिती च्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रथम संस्कार भारती जिल्हासचिव प्रभाकर चोराखळीकर यांनी स्व.महानोर व स्व. देसाई यांचा जीवनपट उलगडून उजाळा दिला. 

जिल्हा कार्याध्यक्ष अनील ढगे यांनी स्व.ना.धों. महानोर यांच्या हृदय स्पर्शी आठवणी सांगितल्या त्याच बरोबर स्व. नितीन देसाई यांचे स्नेही  देवगिरी प्रांत चित्रकला विधाप्रमुख शेषनाथ वाघ यांनी आठवणीतले स्व. नितीन दादा यांचे आजवरचे जीवन चरित्र उलगडले अश्या महान व्यक्तीमत्वास आपण मुखलो अशी भावना व्यक्त केली. श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा संगीत विधाप्रमुख सुरेश वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते.

 
Top