धाराशिव (प्रतिनिधी)- कलाविष्कार अकादमी व मराठवाडा साहित्य परिषद शाखा धाराशिवच्या वतीने दिला जाणारा मानाचा जेष्ठ साहित्यिक कै. माधव गरड यांच्या स्मरणार्थ राज्य स्तरीय गद्य पुस्स्कार प्रसिद्ध साहित्यिक आशिष देशपांडे यांच्या ’काटेरी कुस ’ या कादंबरीस जाहिर करण्यात आला असून लवकरच समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल असे कलाविष्कार अकादमी चे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज नळे मसाप जिल्हाध्यक्ष नितीन तावडे यांनी सांगितले.