परंडा (प्रतिनिधी) - भरधाव पिकअपची धडक बसल्याने मोटारसायकलस्वार युवक जागीच ठार झाला तर त्याच्या सोबतचा एकजण गंभीर जख्मी झाला आहे ही घटना परंडा - सोनारी रस्त्यावरील खानापूर पाटीजवळ शुक्रवारी  संध्याकाळी घडली आहे. 

या घटनेची परंडा पोलीसा कडून मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील कुंभेजा येथील अलीम पठाण (वय 16 वर्ष) व हिंगणगाव (खु.)येथील यश जोगदंड  (वय 35 वर्ष) हे दोघेजण मोटर सायकलवरून परंडा येथून कुंभेजाकडे जात होते. दरम्यान सोनारीहून परंडाकडे जात असताना समोरून भरधाव येणारा पिकअप व मोटरसायकलची खानापूर पाटीजवळ जोरदार धडक होऊन यात अलिम पठाण जागीच ठार झाला तर यश जोगदंड गंभीर जखमी झाला.यश जोगदंडवर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बार्शी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.हा अपघात इतका भयानक होता की यात मोटरसायकलचा आक्षरशा चुराडा झाला आहे. 

या अपघाताचा पंचनामा पोना गुंडाळे, पोकॉ आडसुळ, पोकॉ भोसले यांनी करून पिकअप चालक समाधान गोडगे ( रा.राजूरी तालुका परंडा ) याच्याविरूध्द परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोना गुंडाळे हे करीत आहेत.


 
Top