धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दलित, शोषित, वंचित यांचे दुःख आपल्या साहित्यातून मांडले. अण्णाभाऊंचा विरोधा भांडवलदाराला, धनिकांना वर्ण व्यवस्था आणि जातीव्यवस्थेला होता. अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळेला जाऊन शिक्षकाच्या डोक्यात दगड मारला परंतु तो दगड हा शिक्षकाला नसून तत्कालीन वर्णव्यवस्थेला होता असे मत प्रा. डॉ. शिवाजीराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अर्थशास्त्र विभागातील प्रा.डॉ. मारुती लोंढे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बबन सूर्यवंशी, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.विद्या देशमुख, दिलिप लोकर आणि सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.