धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत पंचप्रणाची शपथ देण्यात आली. मेरी मिट्टी मेरा देश अभियाना अंतर्गत आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मृतीपित्यर्थ अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात आज पंचप्रणांची शपथ देण्यात आली. यापुढेही महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा. माधव उगिले, प्रा.बालाजी नगरे,प्रा. स्वाती बैनवाड, व महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top