धाराशिव (प्रतिनिधी)-रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून तालु्नयातील ओमळी येथील नाभिक समाजातील एका तरूणींवर अत्याचार करून तिचा निघृण खून करण्यात आला. या प्रकरणी संबधित आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा उस्मानाबादच्या वतीने लक्ष्मण माने यांनी जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निलिमा सुधारक चव्हाण वय 24 हि तरूणी दापोली येथील स्टेट बँकेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून नोकरीला होत्या. 29 जुलै 2023 रोजी तिचे अपहरण करून अत्याचार करण्यात आला. नंतर तिचा निघृण खून करण्यात आला. नाभिक समाजातील अंत्यत गरीब कुटुंबातील या मुलीचा खून करणार्या गुन्हेगारास तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर किशोर राऊत, अक्षय माने, रमेश जगदाळे, चंद्रकांत माने, अनिल माने, विश्वजीत जगदाळे यांच्यासह 25 लोकांच्या स्वाक्षर्या या निवेदनावर आहेत.