धाराशिव (प्रतिनिधी)- महसूल विभागाची विकासकामांमध्ये महत्वपूर्ण भुमिका आहे-ही जबाबदारी ओळखून ती यशस्वीरित्या पार पाडावी-विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.त्यामुळे अधिकारी, कर्मचार्यांनी शासनाच्या योजना जनतेपर्यंत सहज व सुलभ पोहोचविण्यासाठी कामाप्रती सकारत्मक दृष्टीकोण विकसित करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले.
कळंब येथे रायगड मंगल कार्यालयात महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट कार्यकरणार्या अधिकारी व कर्मचार्यांचा आणि दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महसूल अधिकारी व कर्मचार्यांच्या गुणवंत पाल्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी पोलीस उपअधीक्षक एम. रमेश, सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडळकर, अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेद्रकुमार कांबळे, सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी संतोष भोरे,उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, भूमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पाटील, विशेष भूसंपादन अधिकारी राजकुमार माने, विशेष भूसंपादन अधिकारी मांजरा प्रकल्प उदयसिंह भोसले,कळंबच्या तहसीलदार मनिषा मेने,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे,तसेच सर्व तहसीलदार,नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी केले.सुत्रसंचालन वृषाली तेलोरे यांनी तर आभार तहसीलदार मनिषा मेने यानी मानले. तत्पूर्वी यावेळी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोमान्य बालगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.