तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरात बोगस ओळख पञ तयार करुन बोगस पुजारी भक्तांची अर्थिक फसवणूक करुन काही वेळेला दमदाटी करुन शिवीगाळ करीत असल्याने अशा बोगस पुजा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देवुन केली आहे.
श्री तुळजाभवानी दर्शनासाठी व कुल कुलाचार करण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यातुन भाविक भक्त मोठ्या संख्येने श्रीक्षेत्र तुळजापूर येथे येत असतात. परंतु सध्या मोठ्या प्रमाणात बोगस पुजारी ओळखपत्र तयार करुन हे बोगस पुजारी भक्तांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुक करुन काही वेळा दमदाटी, शिवीगाळ करतात असे अनेक प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे, अधिकार (हक्क) असणार्या पुजार्यांची विनाकारण बदनामी होत आहे.
मुळ हक्कदार (अधिकार) असणारे पुजारी यांच्याकडे येणारे भाविकभक्त हे वंशपरंपरागत येत असतात. त्यांच्याकडुन पुजारी राहण्याचे भाडे आकारीत नाहीत, फसवणुक करीत नाहीत. तरी भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी रात्री 11:00 वाजण्याच्या नंतर चौका चौकात उभारणार्या व फिरणार्या व्यक्तिवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. तसेच मुळ हक्कदार पुजारी यांना बायोमॅट्रीक ओळखपत्र दिल्यास शहरात, मंदिरात भाविक भक्तांची फसवणुक बंद होण्यास मदत होईल.