तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी पुरातन दागदागिने प्रकरणी जर कोणी दोषी आढळले तर त्या गुन्हेगाराला व  कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचे प्रतिपादन पालकमंञी तानाजी सावंत यांनी श्री तुळजाभवानी दर्शनानंतर पञकारांशी बोलताना केले.

पालकमंञी तानाजी सावंत यांनी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. श्री तुळजाभवानी दर्शनानंतर मुख्य प्रशासकीय कार्यालयात  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष  तथा जिल्हाधिकारी डॉं. सचिन ओम्बासे व प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार डॉं संतोष पाटील, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर  इंतुले, धनंजय सावंत, मोहन पेनुरे, अनिल खोचरे, गौतम लटके, सुरज सांळुके, दत्ता सांळुके, संभाजी पलंगे  आदी उपस्थितीत होते. 

पञकारांशी बोलताना सावंत पुढे म्हणाले कि, श्रीक्षेञ तुळजापूर विकास आराखडात मी माझे वीस मुद्दे समाविष्ट करण्यास सांगितले होते. ते समाविष्ट झाल्यानंतर तयार झालेला विकास आराखडा मी बघणार असुन माझासह सर्वाचें समाधान झाल्यानंतर शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणार असल्याचे यावेळी म्हणाले.


जुने व नवे दागिन्यांच्या नोंदी पाहणार

दागदागिने गहाळ, चोरी प्रकरणावर  बोलताना पालकमंत्री  सावंत म्हणाले कि, दागदागिने मोजदाद चालु आहे. पंधरा वर्षा पुर्वी मोजदाद झालेले रँकॉंर्ड सध्या उपलब्ध करुन देण्याचे काम सुरु आहे. ते उपलब्ध झाल्यानंतर जुन्या नव्या रेकॉंर्ड हिशोब मांडल्यानंतर नव्या जुन्या रेकॉंर्डची जुळवणी झाल्यानंतर पुरातन दागदागिने

जुळवणी झाल्यानंतर सर्व बरोबर आहेत कि गहाळ झाले किंवा चोरीला गेले हे स्पष्ट होणार आहे. नंतर गहाळ व चोरी झाली असेल तर यातील गुन्हेगारांना मी पाठीशी घालणार नाही असे यावेळी म्हणाले. मोजदाद करताना जुन्या दागिने ठिकाणी नवे दागिने ठेवल्याचा प्रश्न पञकारांनी करताच या बाबतीत व्हेरीफाय केल्यानंतर या बाबतीत बोलणे योग्य ठरेल असे पालकमंत्र्यांनी सांगितले.


 
Top