धाराशिव (प्रतिनिधी)-विभाजन विभिषिका फाळणी दिवस निमित्ताने मूक रॅली, चित्र प्रदर्शनी, व्याख्यान, असे कार्यक्रम दि 14 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित केले आहेत. आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य पाटील यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ यांचे पूजन करून मूक रॅलीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
आ. राणा जगजितसिंह पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य यांच्या उपस्थितीत ही मूक रॅली राजमाता जिजाऊ चौक येथून सकाळी साडे नऊ वाजता निघणार असून ही मूक रॅली जिजाऊ चौक, लेडीज क्लब, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छ. शिवाजी महाराज चौक ते नगर परिषद नाट्यगृह इथपर्यंत जाऊन विसर्जित होणार आहे. नाट्यगृह इथेच चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यानंतर छ.शिवाजी महाराज नाट्यगृहात जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक बुबासाहेब जाधव यांचे व्याख्यान होणार आहे. तरी सदरील कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी, विविध आघाडी, मोर्चा चे सर्व कार्यकर्ते आणि देशभक्त नागरिकांनी राजमाता जिजाऊ चौक येथे सकाळी साडे नऊ वाजता वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रम संयोजक तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज नळे यांनी केले आहे.