धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा पशुसंवर्धन विभागाअंतर्गत एकदिवसीय तांत्रिक कार्यशाळा व लंम्पीरोग कालावधीमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.

या कार्यशाळेत डॉ.अनिल भिकाने यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचार्‍यांना मेडिसिन प्रोटोकॉल न्युट्रिशनल प्रोटोकॉल आणि इतर तांत्रिक विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. मेडिसिन प्रोटोकॉलसाठी डॉ.रवींद्र जाधव तर न्युट्रिशन प्रोटोकॉल करिता डॉ.प्रफुल्लकुमार पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन दिले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पशुधन अभियान स्मार्ट योजना आणि राष्ट्रीय गोकुळ मिशन याबाबत डॉ.निलेश खेलाटे यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे उद्घाटक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे यांनी सर्व उपस्थितांना लंम्पीसाथरोग नियंत्रणासाठी केलेल्या उस्फूर्त कार्यास शुभेच्छा दिल्या व सुंदर माझे कार्यालय भाग 2 अंतर्गत आपल्या कार्यालयाची रंगरंगोटी, कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवणे, वृक्षारोपण करणे त्याचप्रमाणे अभिलेखे वर्गीकरण व इतर अनुंषगिक बाबींबाबत यापुढेही असेच उत्कृष्ट कार्य करण्याबाबत आवाहन केले. पशुसंवर्धन विभाग हा विविध कार्यक्रमात तसेच खेडोपाडी दूरच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी वाहन जाण्याची सोय नसताना देखील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचारी हे शेतकर्‍यांच्या दारी जाऊन या सर्व मूलभूत सुविधा अत्यंत प्रामाणिकपणे देत आहेत. असेही जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यतीन पुजारी यांनी यावेळी सांगितले.

 
Top