परंडा (प्रतिनिधी)- श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे नगरपरिषद कार्यालय परंडा जिल्हा उस्मानाबाद यांच्या दिनांक 8 ऑगस्ट 2023 च्या संदर्भीय पत्रानुसार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत पंचप्राण शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न झाला. शासन स्तरावरून आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या धरतीवर संदर्भीय मार्गदर्शक सूचना अन्वये प्रायोजित समारोपक्रम अभियांतर्गत 9 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात बाबत शासनाने कळविले आहे.
मेरी मिट्टी मेरा देश मिट्टी को नमन विरोंको वंदन अभियानांतर्गत महाविद्यालयात पंचप्राण शपथ ग्रहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. डॉ. सचिन चव्हाण, प्रा. डॉ. विद्याधर नलवडे, प्रा. संतोष भिसे, प्रा. विजय जाधव, प्रा. तानाजी फरतडे, प्रा. अनंत अनभुले, प्रा. कीर्ती पायघन, प्रा. प्रतिभा माने, प्रा. खारे व प्रा. मोरवे यांची उपस्थिती होती.
आयोजित क्रांती दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी च्या महापुरुषांचे योगदान लाभले आहे त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले. तर प्रा. डॉ. विद्याधन नलवडे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.