धाराशिव (प्रतिनिधी)-येथील वीरशैव जंगम मठ ट्रस्ट धाराशिवच्या वतीने काशी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजाभाऊ मुंडे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा आदर्श शिक्षण संस्था अध्यक्ष सुधीर पाटील, माजी नगरसेविका सौ. प्रेमाताई पाटील यांच्या शुभ हस्ते श्री. श्री.108 राचय्या महाराज यांच्या संजीवन समाधी चे पूजन करण्यात आले. वीरशैव जंगम मठ ट्रस्ट च्यावतीने काशी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच वर्षी
90 यात्रेकरूनी काशी यात्रेसाठी सहभाग नोंदविला.सर्व मान्यवरांचा सत्कार वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबाद च्या वतीने अध्यक्ष शिवानंद कथले कोषाध्यक्ष वैजिनाथ गुळवे वेळी सर्व दिलीप गुळवे यांनी केला. या वेळीं मान्यवरांनी व समाजबांधवांनी सर्व काशी यात्रेकरुस प्रवास सुखकर व्हावा म्हणुन शुभेछ्या दिल्या. या वेळी बहु संख्याने लिंगायत समाज बांधव उपस्थित होते. प्रास्तविक वीरशैव जंगम मठ ट्रस्ट धाराशिवचे अध्यक्ष शिवानंद कथले यांनी केले. आभार प्रदर्शन वैजिनाथ गुळवे यांनी केले.