धाराशिव (प्रतिनिधी)-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्षा निमित्त व्याख्यानाचे आयोजन दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10: 30 वा.करण्यात आलेले आहे.
सदर व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून शिवाजी महाविद्याल अमरावतीचे माजी प्राचार्य डॉ. रमेश अंधारे हे उपस्थित राहणार आहेत. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे कार्य आणि कर्तृत्व यावर सदर व्याख्याते प्रकाश टाकणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे असणार आहेत. सदर व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयातील आयोजन समितीने केले आहे.