धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथे दि.27 ऑगस्ट 2023 रोजी साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.
काळेगाव येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 390 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 60 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीराचे उदघाटन उपसरपंच संतोष पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे सरपंच शुभांगी भोवाळ, अण्णा भाऊ साठे जयंतीचे अध्यक्ष नागेश भोवाळ, उपाध्यक्ष मल्लीनाथ हाटकर, शाळा समितीचे अध्यक्ष वैजिनाथ उंबरे, चेअरमन ज्ञानदेव उंबरे, नवनाथ टपले, ग्रा.प. सदस्य मनिषा मुळे, सुमन गडदे, संगिता गडदे, विशाल मुळे, नितीन मुळे, विलास साखरे, सवळामराम जेटीथोर, भिमराव साखरे, बालाजी कांबळे, शाम काटवते इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. अदित्य सुतार, डॉ. अजय घुगे, डॉ.नियाज फारोकी, डॉ. वेदांत रेणाळकर, डॉ. यश सिंग यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे, योगेश मारडकर, प्रा. आरोग्य केंद्र मंगरुळ च्या आशा कार्यकर्त्या उषा वारकड यांनी परिश्रम घेतले.