तुळजापूर (प्रतिनिधी)- कृष्णा मराठवाडा सिंचन उपसा योजने अंतर्गत धाराशिव जिल्हयास 19 टीएमसी पाणी शाषणाने देण्याचे जाहीर केले होते ते 7 टीएमसी वर कसे आले असा सवाल करुन ठरल्या प्रमाणे आमच्या हक्काचे पाणी द्या. पाण्यासाठी शासनाला जाब विचारु अन्यथा या पाण्यासाठी लोकशाही आंदोलन करु असा इशारा माजी मंञी मधुकरराव चव्हाण यांनी सोमवारी पञकार परिषद घेवुन दिला.
यावेळी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले की, मराठवाड्याचा पाण्याचा बँकलाग भरुन काढण्यासाठी व शेती व पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी धाराशिव जिल्हयात टप्पा क्रमांक 1 व टप्पा क्रमांक 2 माध्यमातून 19 टीएमसी पाणी देण्यास शासनाने 2007 ला मान्यता दिली. उर्वरीत चार टीएमसी पाणी बीड, आष्टी कासारला देण्याचे नियोजन आहे.. या सात टीएमसी मधील 1 टीएमसी पाणी तिर्थक्षेञ तुळजापूरसाठी होते. त्या पाण्यात ही शेजारील गावच्या जलजीवन पाणीपुरवठा योजना घालुन तिर्थक्षेञ तुळजापूरचे पाणी पळवल्याचा आरोप केला. आम्ही पाठपुरावा करुन कँनील पंपींगव्दारे पाणी उपलब्ध करुन दिले.
माञ हे पाणी मराठवाडातील धाराशिव जिल्हयातील तुळजापूर तालुक्यात आणण्यास उशीर होत असल्याने मराठवाडासाठी पैसे खर्च करुन आणलेल्या पाण्यावर पश्चिम महाराष्ट्रातील मंडळी वापर करत असल्याचे यावेळी म्हणाले. हे काम वेळेत केले गेले असते तर शासनाचे शेकडो कोटी रुपये वाचुन तुळजापूर तालुक्यात पाणी आले असते. पण वेळेवर पैसे खर्च न केल्याने आज आपणास हे पाणी मिळत नसल्याचे म्हणाले. मी विरोधक टीका करण्याचा उद्दैशाने बोलत नाही तर शेतकरी प्रतिनिधी म्हणून बोलतोय असे यावेळी म्हणाले. शासनाने ठरल्या व बोलल्या प्रमाणे आमच्या हक्काचे 19 टीएमसी पाणी द्यावे, अन्यथा आम्हाला संघर्ष करावा लागेल असे यावेळी म्हणाले. या वेळी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष अँड धिरज पाटील, राजाभाऊ शेंडगे उपस्थितीत होते.