धाराशिव (प्रतिनिधी)-गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने सरहद्दीवरील वीर जवानांना रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने मंडळातील महिला, युवती व मुली यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या वर्षाच्या निमित्ताने, चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेबद्दल इस्त्रोतील शास्त्रज्ञाना राखी पाठवून त्यांच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यासाठी आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या शुभहस्ते राखी पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली. यावेळी प्रा. गजानन गवळी, डॉ. अजित नायगावकर, प्रा. भालचंद्र हुच्चे,मुझेमिल पठाण यावेळेस उपस्थित होते. श्रीयुत ओंबासे यांनी मंडळाच्या या कार्यास शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.