धाराशिव (प्रतिनिधी)-जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्रकार  संदीप महाजन यांना झालेल्या अमानुष मारहाण आणि शिवीगाळ केलेल्या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करावी व कडक कारवाई करण्याच्या  मागणीचे निवेदन  व्हॉइस ऑफ मीडिया धाराशिव जिल्ह्याच्या वतीने  शुक्रवार (दि.11 ऑगस्ट) रोजी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले

याविषयी सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ केली आणि त्यांच्या समर्थक गावगुंडांनी भर रस्त्यात अडवून महाजन यांना बेदम मारहाण केली या घटनेचा व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा उस्मानाबाद  जाहीर निषेध करते.तसेच तात्काळ या गावगुंडांना अटक करून कठोर शिक्षा करावी. तसेच संबंधिताना अटक झाली नाही व पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत  कडक शासन झाले नाही तर व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हाध्यक्ष साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, महानगराध्यक्ष मालिकार्जुन सोनवणे, कार्याध्यक्ष रहीम शेख, तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, रतिलाल शहा, शेख जफर, शितल वाघमारे, सलीम पठाण, कुंदन शिंदे ,अजित माळी, अमोल गाडे, राजकुमार गंगावणे, राजेश बिराजदार,आकाश नरोटे, शेहबाज शेख आदि पत्रकारांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top