तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पुजे वेळी भाविकांना जास्त वेळ थांबवुन ठेवल्याने  भाविकांचे अभिषेक चुकत,असल्याने अभिषेक झाल्यानंतर लगेच  भाविकांना गाभारा बाहेर घेण्यात यावे याचे उल्लंघन केल्यास संबंधित पुजा-यावर देवुळ कवायत कलम 36 अन्वये कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

श्री देविजींचे दैनंदिन दहीदुध पंचामृत अभिषेक सकाळी 06.00 ते 10.00 वाजेपर्यंत व सायंकाळी 07.00 ते 09.00 पार पाडले जातात. परंतू मागील काही दिवसांपासून श्री देविजींना सकाळचे अभिषेक घालतेवेळी भाविकांना गाभार्‍यात जास्तवेळ थांबून ठेवले जात आहे. हे भाविक अधिक वेळ थांबत असल्याने वेळेत  मागील  भाविकांचे अभिषेक देविजींना होत नसल्याचे  निदर्शनास आले आहे. तरी  अभिषेक पाळीस असलेले पुजारी बांधव व भाविकांचे अभिषेक पुजा घेऊन आलेले पुजारी बांधव यांनी, भाविकांना गाभार्‍यामध्ये जास्त वेळ न थांबविता त्यांचे अभिषेक झालेनंतर लगेच गाभार्‍याच्या बाहेर घेण्यात यावे.

वरील सुचनांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत पुजार्‍यांवर देऊळ कवायतचे कलम 36 अन्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन  तहसीलदार तथा  व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर  यांनी केले आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात गाभारा प्रमुख नेमण्याची मागणी होत आहे. पण त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे गाभारा प्रमुख नेमल्यास अभिषेक पुजा चुकणार नाहीत व भाविकांच्या अभिषेक चुकणार नाहीत.अशा प्रतिक्रिया पुजारी व भाविकामधून व्यक्त होत आहेत.

 
Top