तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काक्रंबा येथे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी काक्रंबा ग्रामपंचायत ने पालकमंत्री तथा आरोग्य मंञी तानाजी सावंत यांना निवेदन देवुन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्य स्थितीत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे.गावच्या लोकसंखेत मोठी वाढ झाली असुन सदरील उपकेंद्रावर सहा गावचा भार आहे. त्या मुळे येथील आरोग्य सेवेवर मोठा ताण पडत आहे. ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य उपकेद्र ऐवजी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आपल्या मंजूर करावे अशा आशयाचा ग्रामपंचायतने बैठकीत ठराव घेवुन निवेदन सरपंच कालिदास खताळ यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी दिले.
–—
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकाम पुर्ण करण्याचे आदेश ठेकेदारास द्या
ग्रामपंचायत काक्रंबा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकाम तीन वर्षापासून अर्धवट असुन सदरील ठेकेदारास वारवांर मुदत देवुन काम पुर्ण केले नाही. तरी संबंधित ठेकेदारास तात्काळ काम पुर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशा मागणीचे निवेदन पालकमंञी तथा आरोग्यमंञी यांना ग्रामपंचायत वतीने देण्यात आले.