तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर  विभागातील कॉम्प्युटर  लॅबला  दि. 25 ऑगस्ट रोजी राञी 07.45 सुमारास  आग लागल्याने यात काही कॉम्प्युटर  व ऐसीचे नुकसान झाल्याचे समजते. ही आग शाँर्टसर्कीट ने लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.                           

तुळजापूर नगरपरिषद अग्नीशमन दलाचे वाहन तात्काळ येवुन त्यांनी आग विझवली. त्यामुळे मोठे नुकसान टळल्याचे समजते. या आगीत एक ऐसी, चार कॉम्प्युटरचे नुकसान झाले असुन काही कॉम्प्युटरमध्ये अग्नीशमन दलाने मारलेले पाणी गेल्याचे वृत्त आहे. कॉम्प्युटर लॅबला आग लागल्याचे समजताच आजुबाजुला असलेल्या युवकांनी आग विजवण्यास मदत केली. यावेळी कॉम्प्युटर  लँबमध्ये आग लागताच धुराने लँब भरुन गेला. सदरील आगेमध्ये किती नुकसान झाले या बाबत नेमका आकडा मिळू शकला नाही.


 
Top