धाराशिव (प्रतिनिधी) - काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या अधिपत्याखाली प्रदेश उपाध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी प्रदेश सहसचिवपदी मेहराज अल्लानूर शेख यांची नियुक्ती एका पत्राद्वारे केली आहे.
या निवडीबद्दल काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, विश्वास शिंदे आदींनी अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हे नियुक्तीपत्र काँग्रेस भवनमध्ये जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू, जिल्हा उपाध्यक्ष खलील, प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, ॲड. जावेद काझी, डॉ. स्मिता शहापूरकर, शिलाताई उंबरे, उमेश राजे, धनंजय राऊत, प्रभाकर लोंढे, कृष्णा तवले, भाऊसाहेब उंबरे, सरफराज काझी, अहमद चाऊस, दादा पाटील, अब्दुल लतिफ, ॲड.विश्वजीत शिंदे, ॲड. राहुल लोखंडे, शहाजी मुंडे, जयसिंग पवार, गणेश सापते, अभिमान पेठे, अतुल चव्हाण, अमर माने आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.