धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल व महाराष्ट्र ज्ञान मंडळ मर्यादित (एमकेसीएल) ही संस्था महाराष्ट्र राज्य शासन, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत ची प्रायोजक असलेली ही संस्था महाराष्ट्रातील 9 प्रमुख विद्यापीठे, शिक्षण संस्था व काही सामाजिक संस्था यांच्या सहयोगातून स्थापन झाली आहे. सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययन, अध्यापन व शैक्षणिक व्यवस्थापन क्षेत्रात ही संस्था गेली 21 वर्षे कार्यरत आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्यसाधून परीक्षेचे आयोजन शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना काही क्रांतिकारी, सत्याग्रह, स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी महापुरुष यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यावर आधारित परीक्षा द्यावी असा उपक्रम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये राबविला गेला.
श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये महाराष्ट ज्ञान मंडळ मान्यताप्राप्त अधिकृत प्रशिक्षण केंद्र अण्णा इन्फोटेक व सिनर्जी इन्फोटेक तर्फे दिनांक 11 व 12 ऑगस्ट 2023 रोजी हि परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेमध्ये Guruvarya K.T. Patil Foundation Class मधील 387 व श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील इयत्ता 8 वी मधील 917, इयत्ता 9 वी मधील 1088 व इयत्ता 10 वी मधील 871 अशा एकूण 3263 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच सदर परीक्षा घेयण्यासाठी Guruvarya K.T. Patil Foundation Class चे प्रमुख डॉ .विनोद अंबेवाडीकर, इयत्ता 8 वी चे पर्यवेक्षक एन.एन .गोरे , इयत्ता 9 वी चे पर्यवेक्षक एस.जी.कोरडे सर व इयत्ता 10 वी चे पर्यवेक्षक वाय.के .इंगळे तसेच इयत्ता 8 वी ते 10 वी च्या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. तसेच परीक्षा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक साहेबराव देशमुख व उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, अण्णा इन्फोटेक चे चेअरमन आदित्य पाटील, महाराष्ट्र ज्ञान मंडळ धाराशिव जिल्ह्याचे प्रमुख धनंजय जेवळीकर, संतोष बनसोडे व हणमंत इंगळे यांनी मार्गदर्शन केले व हा उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी अथक परिश्रम आदित्य व अथर्व पाठक यांनी घेतले.