धाराशिव (प्रतिनिधी)- गडपाटी आळणी येथील डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलांतर्गत असणा-या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचा परभणी येथील स्व.वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी यांच्या हस्ते करण्यात आला.यामध्ये सिमा लोहार यांनी हरियाणातील हिस्सार येथे पार पडलेल्या हॉलीबॉल स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन सुवर्णपदक तर मोरे अंकिता व कुमारी कृष्णाई इनामदार यांनी सांस्कृतिक माईन स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळविल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉ. गोखले, डॉ. देवसरकर, डॉ. मोरे, प्रा. राठोड, प्रा.आशा देशमुख, प्रा. चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील, कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक हरी घाडगे यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंदाचेही यावेळी कौतुक करण्यात आले. या यशाबद्दल धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी ही कौतुक केले आहे.


 
Top