धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हयातील आजी, माजी सैनिक, वीरपत्नी व अवलंबितांसाठी 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल सप्ताहाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत 5 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे.जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक, वीरपत्नी व अवलंबितांनी त्यांच्या विविध अडीअडचणींबाबत सविस्तर अर्ज तीन प्रतींमध्ये सर्व पुराव्यांसह व माजी सैनिक ओळखपत्रासह तहसिल कार्यालयात सादर करावेत अथवा प्रत्यक्ष बैठकीस हजर रहावे, असे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी कळविले आहे.