धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक महापुरुषांच्या जयंती व सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी डॉल्बीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मात्र या डॉल्बी मानवी शरीरासाठी अतिशय घातक असून त्यांच्या करणे आवाजामुळे  शरीराच्या वेगवेगळे अवयवांवर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे संपूर्ण जिल्हाभरातील शहरासह ग्रामीण भागात सर्व महापुरुषांच्या जयंती मिरवणुका, सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम व लग्न समारंभ डॉल्बीमुक्त करण्याचा सर्व समाजाच्या बैठकीमध्ये एक मुखी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दि. 6 जुलै रोजी केले.

उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत धार्मिक सण, उत्सव महापुरुष जयंती साजरी करणार्‍या मंडळाच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, डॉ विशाल वडगावकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख, कार्डीओलॉजिस्ट डॉ विशाल वडगावकर, डॉ स्वप्नील यादव आदीसह विश्वास शिंदे, प्रकाश जगताप धनंजय शिंगाडे, मसूद शेख, अतुल बागल, मैनोद्दीन पठाण, बाळासाहेब शिंदे, महबूब पाशा पटेल, प्रभाकर लोंढे, विष्णू इंगळे, सिद्धार्थ बनसोडे, विशाल शिंगाडे, रॉबिन बगाडे, इम्तियाज बागवान, मेसा जानराव, कुंदन वाघमारे, विलास लोंढे उपस्थित होते. 

तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की, डॉल्बीच्या कर्ण कर्कश आवाजामुळे उस्मानाबाद शहरातील शासकीय जिल्हा रुग्णालय, निरामय व सुविधा हॉस्पिटलमधील अनेक रुग्णांची शारीरिक स्थिती बिघडल्याचे मी प्रत्यक्ष या मिरवणुकी दरम्यान अनुभवले आहे. डॉल्बीमुक्त सर्व उत्सव साजरे करावेत अशी आवाहन त्यांनी केले. 

यावेळी डॉ. विशाल वडगावकर, डॉ. सचिन देशमुख, डॉ. स्वप्नील यादव, उस्मानाबाद उपविभागीय प्रभारी स्वप्निल राठोड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर विश्वास शिंदे, प्रकाश जगताप, धनंजय शिंगाडे, मसूद शेख, विशाल शिंगाडे आदींसह इतरांनी या चर्चेत भाग घेत संपूर्ण जिल्ह्यासाठी डॉल्बीमुक्त करण्याचा मनोदय व्यक्त केला.

सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी तर प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड मानले. यावेळी उस्मानाबाद शहरासह ग्रामीण भागातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top