तेर (प्रतिनिधी)- आषाढी सोहळ्यात घाण झालेल्या पंढरपूर मधील चंद्रभागा नदीपात्र स्वच्छतेसाठी आर्ट ऑफ लिविंग परिवार तेर यांचे योगदान लाभले. आर्ट ऑफ लिविंग परिवार तेर व धाराशिव यांच्यावतीने पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्र स्वच्छतेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये विजयसिंह फंड, बालाजी भक्ते, नवनाथ पांचाळ ,नारायण साळुंके ,परमेश्वर साळुंके, उमेश राऊत, काका हेगडकर, सुधाकर चव्हाण, बबन कोकरे, प्रसाद राऊत, सोमनाथ यादव, जगन माळी, भूषण भक्ते, शिवानंद रोडगे, सुनिता पांचाळ, मंगळ पांचाळ, विद्या फंड, आशा माळी, भाग्यश्री भक्ते, उषा इंगळे, रेश्मा साळुंके, पुष्पा नाईकवाडी, स्वाती भक्ते, मंगल कोकरे, आशा राऊत, उमेश राऊत यांच्यासह लहान मुलांनी उत्साहाने चंद्रभागा नदी स्वच्छतेसाठी परीश्रम घेतले.त्यासाठी आर्ट ऑफ लिविंग परिवार धाराशिव चे योग प्रशिक्षक नंदू तांबडे यांनी प्रोत्साहन दिले.