धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळले असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पाऊल उचलली आहे. त्यानुसार वाशी येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकत 10 लाख 71 हजार 910 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरूध्द पोलिस ठाणे वाशी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पांलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा हद्दीत अवैद्य धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार उप विभाग कळंब येथील सहा. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी पोलिस स्टेशन वाशी हद्दीतील पारा चौक येथे तिर्रट जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे कळंबच्या पथकाने साडेचार वाजेच्या सुमारास छापा मारला. तेथे 24 लोक गोलकार बसुन तिर्रट नावाचा जुगार खेळत असतांना मिळून आल्याने त्यांच्याकडे  रोख रक्कम 99 हजार रूपये तसेच 12 मोटर सायकली, ज्याची अंदाजे एकुण किंमत 5 लाख 65 हजार व एकुण 23 मोबाईल फोन एकुण 2 लाख 9 हजार रूपये. तसेच पत्याचे 255 बॉक्स किंमत अंदाजे 1 लाख 98 हजार रुपये अशी एकुण किंमत 10 लाख 71 हजार 910 रुपयाचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आला. यातील आरोपी विरुध्द पोलीस ठाणे वाशी  येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी कळंब येथील पोउपनि पुजरवाड, फतेपुरे, तारळकर, सय्यद, जाधव, पोलीस ठाणे कळंब,पोलीस नाईक शेख, पोलीस अमंलदार भांगे, पठाण,  खांडेकर, गरड, राउत, चव्हाण, पोलीस हावलदार चाफेकर पोलीस ठाणे वाशी येथील सहा.पोलीस निरीक्षक ससाणे, लोंढे, पोलीस नाईक लाटे, यादव, सय्यद, सुरवसे, भैरट, वारे, घुले यांचा समावेश आहे.

 
Top