धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामास दिरंगाई होत आहे. त्यामुळे रस्ते उकडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी थांबल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरलेला आहे. या चिखलामुळे नागरिकांना ये-जा करणे फार जिकरीचे झाले असून वाहने घसरुन पडत आहेत. त्यामुळे जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर परिसरात दुर्गंधी पसरल्याने डुकरांसह इतर जनावरांचा वावर वाढल्याने नागरिक अक्षरशः वैतागलेले आहेत. याबाबत नगर परिषद प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील सोयीस्करपणे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी शिवसेना (ठाकरे) शहर उपप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातील चिखल नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात फेकून चिखल फेक आंदोलन दि. 10 जुलै रोजी केले.

या आंदोलनामध्ये इस्माईल पटेल, सुलतान पठाण, सईद शेख, मैनुद्दीन शेख, जैद शेख, आसेफ पठाण, रोहन गव्हाणे, कबीर अहमद, आय.एल. कबीर, इस्माईल पठाण, आयुब खान पठाण, खालीद शेख, अब्दुल शेख, अजित बाकले, फरहान शेख, लैला शेख, इम्तियाज शेख, अल्ताफ शेख आदींसह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top