तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या सौभाग्यवती लताताई एकनाथ शिंदे यांनी सोमवार दि. 10 जुलै रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरला श्रीतुळजाभवानी मातेचे यथासांग पुजा करुन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपारिक पुजारी प्रशांत गंगणे यांनी केले. यावेळी विशाल रोचकरी, बालाजी गंगणे उपस्थितीत होते. सौ लताताई यांनी मुंबई येथुन येताना देविस साडीचोळी, सोन्याची नथ, पाच फळे व ओटीचे साहित्य देविजींचा पुजेसाठी खास करुन आणले होते.

आषाढी एकादशी पुर्वी मुख्यमंञी एकनाथ शिंदेचे पुञ सहकुंटुंब देवीदर्शनाला येवुन गेले. त्यानंतर याच महिन्यात मुख्यमंत्री यांच्या पत्नी देवी दर्शनार्थ येवुन गेल्याने मुख्यमंञी एकनाथ शिंदे कुंटुंबांचा वावर श्री तुळजाभवानी दारी वाढल्याचे दिसून येते.

 
Top