तुळजापूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्र सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होत आहे. आशिष शेलार यांना कोणा-कोणाला मंत्रीपद मिळणार या संदर्भात विचारल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे मंत्रीपद कोणाला मिळणार हे सांगण्यास मी सरकारचा प्रवक्ता नाही असे सांगून आपली नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली.

सोमवारी भाजप प्रवक्ते आ. अशिष शेलार यांनी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे येवुन श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले. देवी दर्शनानंतर पञकारांशी संवाद साधताना शेलार म्हणाले कि, मुंबई महानगर पालिकेत आम्हाला 150 जागा मिळतील असे स्पष्ट केले. 

राजकारणात अनैतिकता नाही तर हा श्रध्देचा विषय आहे

राजकारणात काही गोष्टी अनैतिक होतायत याला प्रश्नला उत्तर देताना शेलार म्हणाले कि, अनैतिकतेचा प्रश्न नाही तर तो श्रध्देचा विषय आहे असे सांगून त्यांनी मंञी अजित पवार यांचा सत्तेतील सहभाग हा राज्याचा विकासासाठी फायदेशीर ठरेल असे सांगितले. ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आपण फुट पाडली यावर बोलताना आ. शेलार यांनी विरोधक अर्धसत्य सांगतात पुर्ण सत्य सांगत नाहीत. आम्ही कुण्याही पक्षात फुट पाडत नाही असे स्पष्टपणे सांगितले.

ईडी पोहचणारच

लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी असो ज्यांनी चोरी केली त्यांच्या पर्यंत ईडी पोहचणारच त्यामुळे विरोधक का आरोप करतात याला महत्व नाही. अर्थखात्याचा भार कोणत्या मंत्र्याला द्यायचा हे सर्व एकत्रीत बसून ठरवतील असेही आ. शेलार म्हणाले. रोहीत पवार यांच्या आरोपाला उत्तर देताना शेलार म्हणाले की, त्यांची पहिले टर्म आहे त्यांना काय यातील कळते त्यांचे आमदार कधी पळाले हे त्यांना समजले नाही असे या आरोपाला उत्तर देताना म्हणाले. यावेळी जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, विनोद गंगणे, शांताराम पेंदे,राजसिंह निंबाळकर, आनंद कंदले आदी उपस्थित होते.


 
Top