धाराशिव (प्रतिनिधी)-अनिल कवडे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर विभागातील नागरी सहकारी बँकांच्या कामकाजाचा मार्गदर्शन पर कामकाज आढावा बैठक संपन्न झाली. त्यानंतर अनिल कवडे यांनी मराठवाड्यात नावलौकिक मिळवलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेस भेट दिली.

अनिल कवडे सहकार आयुक्त व निबंध सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचा उस्मानाबाद जनता बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष वसंत नागदे यांनी तर शैलेश कोतमिरे अप्पर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचा सत्कार बँकेचे जेष्ठ संचालक विश्वास शिंदे केला. तसेच गणेश निमकर, सच्छीदानंद नाईकवाडी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांचा सत्कार बँकेचे उपाध्यक्ष वैजनाथ शिंदे यांनी केला. यावेळी एस. यु. शिरापूरकर, विश्वास देशमुख, सम्रत जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाच्या वेळी बँकेचे संचालक एस. व्ही. गोविंदपुरकर, आशिष मोदाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय घोडके व सर व्यवस्थापक एम. बी. गायकवाड उपस्थित होते. 

 
Top