धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूरांसह सर्वसामान्य नागरिकांची भाजप सरकारकडून मोठी पिळवणूक केली जात आहे. जिल्ह्यावर सातत्याने संकटे चालू आहेत, मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वच मंत्रिमंडळ बेफिकीर वागत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपण प्रजेच्या हितासाठी शेतकरी, शेतमजूर यांना संकटात मदत केली. त्यांना संरक्षण दिले, मात्र आज तुमच्या धोरणाच्या विरोधात तुमच्या नावाने या सरकारकडून मताचा जोगवा मागितला जात आहे. त्यासाठी महाराज या सरकारला सद्बुध्दी द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर अनोखे आंदोलन करुन महाराजांकडे साकडे घालण्यात आले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास माजी आ. राहुल मोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पुर्वीप्रमाणे दुधाचे दर ठेवावे, दुधाला एफआरपी हमीभाव कायदा तयार करावा व गायीच्या दुधाला 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये प्रतिलिटर दर निश्चित करावा, सन  2022 चा पिकविमा शेतकर्‍यांना सरसकट त्वरीत वाटप करावा, सततच्या पावसाचे अनुदान व इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

पुढील दहा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रदेश सचिव मसूद शेख, संजय निंबाळकर, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, संपतराव डोके, प्रतापसिंह पाटील, महेंद्र धूरगुडे, अमित शिंदे, मधुकरराव मोटे, संजय कांबळे, नितीन बागल, वाजिद पठाण, कादर खान, सतीश एखंडे, हबीब खान पठाण, अनिल शिंदे, मझहर शेरेकर, रोहित बागल, नितीन बिक्कड, संजय पवार, श्याम घोगरे, श्रीधर भवर, हनुमंत पाटोळे, धैर्यशील पाटील, दिलीप घोलप, रंजना भोजने, अयाज शेख, मुसद्दीक काझी आदींसह आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top