तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत अन्न व भेसळ औषध प्रशासनच्या दुर्लक्षितषपणामुळे भाविकांसह नागरिकांना भेसळ पदार्थ साहित्य घ्यावे लागत आहे. तिर्थक्षेञ तुळजापूरात गेली वर्षभरापासुन दररोज लाखोच्या संख्येने भाविक येतात. त्यांना प्रसादापासुन पुजेच्या साहित्य पर्यत पदार्थ वस्तु साहित्य खरेदी करतात. पण या दर्जदार कि भेसळीचा हे कळुन येत नाही. मिनरल वॉंटर, प्रसादिक पुजेचे साहित्य हळद कुंकु तसेच प्रसादासाठी लागणारे पेढे, केळी याचा दर्जा बाबतीत सांशकता आहे. याची तपासणी सातत्याने होणे गरजेचे आहे, माञ
अन्न व औषध भेसळ प्रशासन अधिकारी, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या दुर्लक्ष मागे काय कारण आहे असा सवाल होत आहे. हा प्रकार भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणारा असल्याने या गंभीर प्रकरणी भेसळ करणार्या मंडळीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पेढे हळदकुंकु प्रसाद साहित्यासह अनेक खाण्याच्या वस्तू, स्वीट मार्टसह हॉंटेल मधुन मोठ्या प्रमाणात विकल्या जातात, माञ याची शुध्दता अर्थिक लोभापोटी होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पुजाच्या साहित्य सह प्रासादिक वस्तूत भेसळ करुन विकल्या जात असल्याची चर्चा आहे.