धाराशिव (प्रतिनिधी)-अल्पवीय मुलीवर दुसर्‍या शेतात काम करणार्‍या सालदाराने वारंवार अत्याचार केले. यात मुलगी गरोदर राहिली. हास प्रकार समोर आल्यावर आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. तपासात आरोपी दोषी आढळला. तसेच न्यायालयाने आरोपीस 20 वर्षे सक्त मजुरी व 50 हजार रूपये दंड ठोठावला.

2 फेब्रुवारी 2011 रोजी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कळंब तालुक्यातील  एका गावात ते उपजिविकेसाठी आले होते. तेथे त्यांची ओळख सालगडी सिध्दार्थ लक्ष्मण खंदारे (रा. उमराव देशमुख, जि. बुलडाणा) सोबत झाली. ओळखीचा गैरफायदा घेत सिध्दार्थने अल्पवयीन मुली सोबत संबध ठेवले. कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पी. एस. आय गुर्सीगे यांनी करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. या प्रकरणात विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून सचिन एस. सुर्यंवशी यांनी काम पाहिले. हे प्रकरण धाराशिव येथून कळंब येथील अति.जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. के. राजेभोसले यांच्या न्यायालयात वर्ग झाले. तेथे शासकीय अभियोक्ता आशिष एस. कुलकर्णी यांनी काम पाहिले. या प्रकरणात डीएनए व अन्य ठोस पुरावे यावरून शुक्रवारी अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. के. राजेभोसले यांनी आरोपीस वीस वर्षाची सक्त मजुरी व 50 हजार रूपये दंड ठोठावला आहे. 


 
Top